Current Events

सहकार भारती कोकण संभागाची निवासी बैठक

शनिवार दि. ४ व रविवार दिनांक ५ आगस्ट २०१८ चा दिवसी लँडमार्क हॉटेल रत्नागिरी येथे घेण्यात आली.

  सदरची बैठक भोजनोत्तर दुपारी ठिक २ वाजता सुरु झाली बैठकीस पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून उपस्थिती ५० च्या वर होती. ठाणे पालघर मधून ३६ तर सिंधूदुर्ग , रायगड व रत्नागिरी येथून १४ जनांनी बैठकीत भाग घेतला.

 बैठकीस लिमये काकू यांच्या सहकार गिताने सुरुवात झाली सर्व मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन  दिपक परवर्धन अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा यांनी सर्वांचे स्वागत केले व बैठकीचे प्रयोजन व कार्यक्रमाची रुप रेखा या बदल माहिती दिली.

    कोकणसंभाग अध्यक्ष जयवंत विचारे यांच्या प्रास्तविक भाषणा मध्ये सहकार भारतीच्या विविध प्रकोष्ठा विषयी माहिती दिली सहकार चळवळ वाढत आहे. पण त्यात गुणांत्मक वाढ होणे गरजेच आहे, त्यासाठी सातत्याने काम करण्याची आवश्यकता असून निरनिराळ्या विभागाचे प्रश्न सोड्वण्याची  गरज असूनत्या साठी आवश्यक ते कार्यकर्ते हवेत व ते शोधण्याचे काम सहकार भारती या चळवळीवर संस्कार करण्याचे काम करत आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख  अतिथी सौ. स्वरुपा साळवी अध्यक्ष जि. प. रत्नागिरी यांचा परिचय करुन दिलाव पुष्प गुच्छ देउन त्यांचे स्वागत करण्यात आले.

     श्री विनय खटावकर महासचिव महाराष्ट्र प्रदेश यांनी सहकार भारतीच्या एकूण कार्याचा आढावा घेतला नैतिक अधिष्ठान असलेल्या लोकांच्या मागे सहकार भारतीय नेहमीच उभी राहते हि एक सपोर्ट सिस्टम आहे.

     पुर्वी सहकार भारतीचे काम महाराष्ट्र,कर्नाटक व गुजरात मध्ये चालत असे आता त्यांचे कार्य क्षेत्र वाढून देशातील सर्व राज्यामध्ये सहकार भारती नॉन पॉलीटीकल अ‍ॅक्टीव्हीटीज करते सहकारांची नैतीक जपनारी संस्था म्हणजेच सहकार भारती होय “सबल सहकार समृद्ध भारत”  म्हणून या समृद्ध भारत देशासाठी सहकार भारतीने सहकाराच्या विविध क्षेत्रातकामास सुरुवात केली आहे. कृषी सेवा सोसायटी, विकास सोसायटी,पाणी वापर सोसायटी, विनकर सोसायटी, मच्छीमार सोसायटी, कामगार सोसायटी, आणी नुकत्याच सुरु झालेल्या अभिनव सेवा संस्था, मायक्रो फायनांस संस्था, बचत गट या मध्ये सहकारभारतीने काम करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच यातला सहकार भारतीचा सहभाग आपणास दिसून यईल.

       रत्नागिरी जिल्हा परिषद अध्याक्षा सौ. स्वरुपा साळवी यांनी सहकार भारतीच्या आगमी अधिवेशनास शुभेच्छा दिल्या व सर्व प्रकारचे सहकार्यदेण्याची ग्वाही दिली तसेच पतसंस्थाचा त्यांना अनुभव आहे. दिपक परवर्धन अतिषय चांगण्या प्रकारे पतसंस्था चालवत असल्याचे उद्गार काढून त्यांचे गुणगौरव केला तसेच स्वत: सौ स्वरुपा साळवी या मायक्रो फायनांस क्षेत्रात काम करत असल्याचे सांगीतले.त्यांच प्रमाणे दिपक पटवर्धन यांचे त्या मार्गदर्शन घेतात असे सांगीतले दुसर्‍या  सत्रात विनय खटावकर यांनी आगामी महाअधिवेशनच्या यशस्वी आयोजना साठी करावयाचे नियोजन अपेक्षीत जिल्हावार उपस्थिती या विषयी विवेचन केले. अधिवेशन शुल्का संबधी विषयास अनुसरुन असे ठरले की , जे सभासर ५/१०/२०१८ पर्यंत नोंदणी करुन पैसे भरतील त्यांना १२००+GST. व  ६/१०/२०१८  वासून पुरे पैसे भरणारांनी १५००+GST रु. घेतला जातील.

    तिसर्‍या सत्रात महाअधिवेशन संदर्भात जिल्हावार बैठका घेण्यात आल्या त्यात प्रत्येक जिल्हातून अधिवेशन प्रमुखाची निवड करावी व जाहीर करावे असे सांगीतले तिसर्‍या सत्रात श्री विनय  खटावकरयांनी पतसंस्था महाधिवेशन कोठे घ्याचये या संबधी चर्चा केली आहे. अधिवेशन स्थल ३ ते ४ दिवसात ठरवून सर्वांणा कळवन्यात यईल आणी सर्व कार्यकत्यांनी या साठी जोर दार तयारी करण्याचे ठरले. श्री शैलेश दरगुडे ठाणे व पालघर या जिल्हायासाठी संघटन  प्रमुख म्हणून जवाबदारी देण्यात आल्याचे जाहीर केले.

   दुपारी राजू ठाणगे यांणी सहकार गित गाउन सभेची सुरुवात केली. त्यानंतर पुठील कार्य क्रमांची आखणी करण्यात आली. त्यात सर्वानी आपल्या विभागचे निवेदन केले कार्यकर्ता प्रशिक्षण व पतसंस्था महाअधिवेशन रत्नागिरी येथे घेण्याचे ठरले असून त्याची जवाबदारी अड् दिपक परवर्धन याच्यावर सोपवल्यात आली आहे. ३० ते ३५ कार्यकर्ते घेउन सिंधुडूर्ग व रत्नागिरीतसेच रायगड जिल्हांचे काम पुढे न्यावे. सहकार भारतीचे काम करु इच्छीनार्‍या सर्व कार्य कर्त्यासह १ आगस्ट ते १५ सप्टेंबर पर्यंत संपर्क अभियान, संस्था सदस्य नोंदणी तसेच व्यक्तिगत सदस्य नोंदणी करावयाची  आहे. २१ सप्टेंबर (लक्ष्मणराव इनामदार यांचे जन्म शताब्धी वर्ष असून त्या अनुशंगाने कार्यक्रम घ्यावेत नागपूर येथील अधिवेशन १८ व १९ आगस्ट येथे प्रत्येक संस्थेचे ३ कार्यकर्ते अपेक्षीत आहे. पतसंस्था अधिवेशनाला जोडून ग्रामीण सहकार तसेच अभिनव संस्था प्रकोष्ठ या साठी पण काम करवयाचे आहे. २२ व २३ जानेवारी पुष्कर तिर्थ येथे राष्ट्रीय अधिवेशन असून त्या साठी कोकण प्रांतातून कार्यकर्ते अपेक्षीत आहेत. प्रांतश: पतसंस्था अधिवेशन ६ व ७ आक्टोंबर ही सर्व अधिवेशन आपणास फंडरेजिंग करणे, शक्ती प्रदर्शन करणे समाजात व शासनात सहकार भारतीचा इंम्पेक्ट निर्माणकरणे या मध्ये पतसंस्थाचे अध्यक्ष,CO . कर्मचारी यांची समावेश करावा.  

     गृहनिर्माण विभाग: –    हाउसिंगचे अधिवेशन पुणे येथे घेण्यात येणार आहे. या साठी कॉडीनेटर  कमिटी नेमण्यात येणार आहे. या पतसंस्था अधिवेशानाचे प्रमुख अड् दिपक पटवर्धन यांच्या मार्फत सर्व निर्णय घेण्यातयेनार आहेत. या साठी काही मंडलीना प्रमुख मार्गदर्शन म्हणून प्रत्येक जिल्ह्या मधून १-१ कार्यकर्ते अधिवेशन संचालन समीती मध्ये घेण्यात यईल. जिल्हायातून ग्रामिण प्रकोष्ठा साठी नावे घ्यावी या साठी चांगले ब्राउचर बनवणे चांग़ले सोवेनियर काढणे अधिवेशन कार्याच्या साठी १फोन घेणे त्या अधिवेशनातूल आपणास किती चांगले कार्यकर्ते मिळाळे यांची नोंद घेता यईल अधिवेशन प्रमुख महेश जी: –  सुनील गायकर (उत्कर्ष नागरी पतसंस्था ) पालवेकर मार्गदर्शन उल्हास नगर, श्री राजू ठाणगे कल्याण, सुदर्शनजी – बदलापूर – मुकूंद गुप्ता वाळूजसर उल्हास नगर विजय रावराणे – मिरा भाईंदर मधून – बाळू वाघमारे पोपट जाधव वसई मधून –भारती पवार वाडा मधून दिलीप म्हात्रे, संतोष पाटकर भिवंडी मधून अभिजित नाडार साधारण १५०० पर्यंत सभासद नोंदणी उद्दीष्ठ ठेवले आहे.

 दि. ५/०८/१८

लिमये काकू यांच्या सहकार गित गायनाने आजची सुरुवात झाली.

संभागाची विस्तृत बैठक

१) कार्यकर्ता अभ्यास वर्ग

२) अभ्यास वर्ग पुस्तीका

३) सदस्य नोंदणीचा आढावा

४) प्रकोष्ठ वाईज कार्यक्रमाचा आढावाघेण्यात आला तो खालील प्रमाणे आहे.

  रायगड कार्यकर्ता अभ्यास वर्ग ३५ जणाचा एक अभ्यास वर्ग घेण्याचे ठरले या मध्ये शैलेश दरगुडे यांनी सुचना मांडली की रायगड व ठाणे यांचा नेरुळ येथे संयुक्त अभ्यास वर्ग घ्यावा यास सर्वांनी मान्यता दर्शविली.

दतात्रेय जोशी – ठाणे विभाग – ठाणे विभागात सहा महानगर पालीका असून प्रत्येक क्षेत्रात एक अभ्यास वर्ग घेण्यात येणार आहे. देसाई सर –सिंधूदूर्ग या जिल्यात अजून पर्यंत कार्य कारीणी झाली नाही. एका महिण्यात येथे कार्य कारीणी स्थापन करुन कूडाळ येथे ३० ते ३५ सभासदस्याचा अभ्यास वर्ग घेण्याचे ठरले आहे. दादा विचारे – रत्नागिरी जिल्हा मोठा असल्या मुळे एक दापोली व एक लांजा येथे अभ्यास वर्ग घेण्याचे ठरले आहे. यांचा उपयोग पतसंस्था अधिवेशनाला होईल.

   महाराष्ट्र प्रदेश: – डॉ.मुकूंदराव तापकिर – कार्यकर्ता अभ्यास वर्ग म्हाजे काय : सहकार भाराती ही कोणची संस्था आहे.  हे कार्यकर्ताना संबधीची उद्दीष्थे, संघटनात्मक रचना, काय आहे.याची घटना कायत्ती आहे. आपल्या कार्याची चौकट पदाधिकारी अधिष्ठित काम नाही. पदे इथे कामाच्या गरजेस्तव निर्माण होतात कार्य मग कोणते आहेत त्यांची रचना कसी असाविर्‍काय करावे काय करु नये.आपले काम व्यक्ति केंद्रीत किंवा गटबाजी नसते चैनल नसते राष्ट्रीयपातळी पासून ते शेवटपर्यंत एकच कार्य पद्धतीअसते त्यालाअभ्यास वर्ग म्हणतात काही वेळा हे वर्ग १ दिवस काही वेळी २ दिवस असतात  याच अभ्यास वर्गातून एक दूसर्‍याला समजून घेणे एक मेकांचे विचार जाणून घेणे

संपर्कअभियान: -  शिर्डी सोलापूर अभ्यास वर्गा नंतर संपर्क अभियान घेण्याचे ठरले होते या मध्ये लोकांकडे जाउन त्यांना सहकार भारती संबधी  अवगत करणे

ठाणे जिल्हा दता जोशी – शासकीय अधिकारी कल्याण डोंबेवली तसेच ठाणे कल्याण डोंबीवली DDR  यांची भेट घेतली, सिंधूदूर्ग – श्री देसाई सर: – आम्ही कणकवली  सिंधूदूर्ग- कुडाल ADR-DDR यांना घेऊन काम करतो आपाणास विकास सोसायटीच्या वार्षिक सभेत जाऊन त्यांनामार्गदर्शन ऐसे पाहिजे.

रायगड (पाटील):- रायगड जिला महासंघ असाल्या कडे मच्छीमार सोसायटी मध्ये काम केले तर सहकार भारती वाढण्यास मदत होईल पावती पुस्तके उपलंब्ध नाहीत

सदस्य्य नोंदणी अभियान: –  खासनिस सर – संपर्क अभियान व सदस्य नोंदणी हे दोन्ही विषय एकच  आहे. जेव्हडा संपर्क होईल तेवडीच सदस्य नोंदणी जादा होईल १ वर्षा साठी १०० रुपय. वेयल्तीक सदस्य, गृहनिर्माण १००रु., पतपेढी १००० रु. घेउन नोंदणी करावयाची आहे.

ठाणे सभासद संस्था १४०० असूनत्या संबधीचे रेकार्ड उपलब्ध नाही .

मिरा भाईंदर: – बाळू वाघमारे मिरा भाईंदर सहकार भारतीचा माननीय श्री. सुर्यकांतजी केलकर यांच्या मार्गदर्शन खाली सुरु झाले आहे – आमची वेब साईट – sbmbmc@gmail.com असी आहे. यामध्ये ३८०० व्यक्तिगत सदस्य आहेत १२०० हॉ.सोसा. सदस्य आहेत, ६३ पतसंस्था सदस्य आहेत. १२५ महिला बचतगट आहेत. सहकार भारतीचे पुस्तक विजय देबाँगण यांनी काढले आहे. त्या साठी आमच्या तर्फे रु. १०००० पुस्तकांसाठी दिले होते सहकार भारतीच्या ऑफिस साठी जवळ जवळ २००० चौरस  फुटांची  जागा घेतली आहे परंतु त्यात इतर हक्का मध्ये इंवेहस्ट्मेट कंपनीच्या NOC ची गरज आहे ती मिळवण्या साठी आम्ही विजय देवांगण, सतिष मराठे , शेखर चरेगावकर यांच्या संपर्क केला पण काम असून झाले नाही जर झाले तर ठाणे जिल्हात संस्थे साठी भारदस्त कार्यालय उपलब्ध होईल मागील काही वर्षापासून या मुळे कार्यकर्ते  नाराज झाले होते पण शैलेश दरगुडे संदेश दरणे यांच्या संपर्का मुळे परत  मिरा भाईंदरचे कार्य सुरु झाले आहे.

 अड् दिपक पटवर्धन सहकारी संस्थाचा कायध्या  मध्येबदल:- या मध्ये कायदा अतिशय पेर्‍सीबल बनवला आहे. सहकारी नियमांना अनुसरुन आपण कोणतीही संस्था स्थापन करु शकता उदा. स्वामी वि. का स सो. पुणे या मध्ये सहकारी संस्थाना आवश्यक सर्व सेवाचे काम केले जाते.

कलम् ७० अन्यवे ज्या केस मध्ये संस्था पार्टी किंवा प्रतिवादी नाही त्यात कोर्टात जाणे अथवा ना जाने आपल्या मर्जीवर आहे. त्याला जबदस्ती करता येणार नाही.

कलम ३६ अन्वये – संस्था हि स्वतंत्र व्यक्ति आहे त्यामुळे त्याला बेगळे अस्तीत्व आहे म्हणून संस्था प्रॉपर्टी  खरेदी करु शकते.

हॉसिंग कलम – १६४ अंवये क्षरवाद विषय संस्थेला सिव्हील कोर्टात नेण्या नेध्या संदर्भात  रजिस्टारगत कणाविले तर त्यांना कोहितजागे बंधन करक नाही.

कन्व्हेन्स:-  मानीव हस्तातर्ण साठी लागणारी कागद पत्रे ८ पर्यंत कमी करण्यात आली असून त्या मुळे काम करणे सुलभ झाले आहे.

MOFA Act-10 प्रमाणे कन्व्हेंस डिड करुन दिले पाहीजे कलम ७७ चा अन्वये कोणती कार्य वाही कायध्याचा विरोधी झाली असेल आणी ती सदभवनेतून झाली असेल तर कायदा ते मान्य करु शकते.

कलम १५४-१५२ पोट नियम दूरुस्ती नाकारळी तर पोट नियमा संबधी प्रकरणात संस्था अपिलात जाऊ शकते पण ६० दिवसाच्या आद अपिलात जायाचे आहे.

 कलम ३२ अन्वये सभासदला माहिती देयाचे बंधन आणी ऑडीट रिपोर्ट ध्यावा असे म्हंटले नाही या मध्ये योग्य तो खर्च देण्याची तयारी दाखावली नसत्यास माहिती देण्याची गरज नाही तसेच खर्च जमा केल्यावर ३० दिवसाचे आत माहीती ध्यावी परंत पैसे भरल्या नंतर येणार्‍या  मैनेजींग कमेटी  ची मिटींग झाल्यावर कागद  पत्रे ध्यायाची आहेत.

तसेच आपल्या संस्था आपल्याच ताब्यात राहतील त्यापण तह हयात राहतील यांची व्यवस्था क्रियेटिव्ह सभासदाच्या व्याख्ये मुळे कायध्याने करुण ठेवली आहे.

कलम ८० अन्वये  – एखादा जूना सभासद अथवा पदाधिकारी टाळाटाळ करत असेल तर गहाळ करत असेल तर तहशिलदाराला आर्डर करुन सदर सभासदाकडून रेकार्ड ताब्यात घेतील

१५२,१५४  कलमान्वये पोट नियम दुरुस्ती कायध्याला किंवा घटानेला अनुसरुन असी ऑडर दिली तर न्याय संगत असत नाही आणी संस्थेची सुनावणी घेणे आवश्यक आहे.

गांधी समितीची शिकारस – नागरी बँकानी कर्ज देताना कायध्याचे उल्लघन केले आहे. त्याला योग्य कारण योग्य कागदपत्रे फायनाशियल स्टडींग, रि पेमेंट केपीसिटी न पहाटा कर्ज देउ नये तसेच विध्यमान संचालक सोडून दुसरे तज्ञ संचालक असावे कर्ज प्रकरण तज्ञ संचालक समिती कडे पाठवून त्यांच्या शिफारसी अनुसार कर्ज वाटप करावे.

यानंतर संघाचे विभागिय कार्यवाह माननीय श्री मोहनराव भावे यांचे मार्गदर्शन पर भाषण झाले त्यांनी सर्वाचे कोतूक केले रत्नागिरी जिल्हयात अभ्यास वर्ग घेतला म्हणून अभिनंदन केले. मा. श्री मुकूंदराव तापकीर यांचे हस्ते पुष्प गुच्छ देवून स्वागत केले.  या नंतर दादा विचारे संभाग अध्यक्ष यांनी आपली उद्दीष्ठे वौयक्तीक सभासद, संस्था सभासद, संपर्क अभियान हे सर्व वेळेत पार पाडण्या साठी कटिबद्ध आहे सहकार भारतीच्या मार्फत एकत्र येऊन सहकाराला पोषक वातावरण तयार करुन  यांचे कार्य पुढे जावे त्या हिशोबाने प्रत्येक जिल्हात कार्यालय झाल्यावर प्रत्येक तालुक्यात प्रकोष्ठ निर्माण केले जाईल .

विभागीय संघटक श्री म्हात्रे यांनी सर्वांचे आभार मानून पहिल्या दिवसी श्रीकांत चादोरकर व दुसर्‍चा दिवसी श्रीशैलेश दरगुडे यांनी सभेचे सुत्र संचालन केले व सह संघटक श्री विनोद म्हात्रे यानी आभार प्रदर्शन केले. समापन मंत्रा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

मिरा भाईंदर सहकार भारती तर्फे: –

१) श्री राजन वासु नायर

२) बाळू वाघमारे

३) संजय सिंह

४) कृष्णकांत सोनी हे उपस्थित होते.

Start Date : 04-08-2018 Time : 06:00 AM
End Date   : 05-08-2018 Time : 06:00 PM